शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जी आपली किंमत लावून तिथे गेले आहेत त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्न आहे. याआधीही लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. पण ती व्यक्ती विरोधी पक्ष सोडून स्वार्थासाठी सत्तापक्षात गेली होती,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
#AadityaThackeray #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #Maharashtra #MVA